हॉंगकॉंगमध्ये स्रकारविरोधात पुन्हा विराट मोर्चा

हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमध्ये निर्माण झालेल्या सरकारविरोधातील असंतोषाच्या वातावरणामध्ये अधिकच भर पडली आहे. सरकारविरोधातील तीव्र असंतोषामुळे गेल्या काही आठवड्यात निघालेल्या विराट मोर्च्याप्रमाणेच आजही हजारो जणांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक आता जरी मागे घेण्यत आले असले तरी लोकशहीवादी सुधारणा, सार्वत्रिक मताधिकार आणि निमस्वायत्त हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्याच्या मागणीला दाबण्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि रबरी गोळ्या झाडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. हॉंगकॉंगल 1997 साली चीनकडे सोपवण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ यापूर्वी काढलेल्या मोर्च्याच्यावेळी आंदोलकांनी संसदेमध्ये घुसून तोडफोड केली होती.

आजचा मोर्चा हॉंगकॉंगमधील अशाप्रकारचा सातवा मोर्चा होता. मोर्चामध्ये ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. सर्वसाधारणपणे असे मोर्चे शांततेने पार पडतात. मात्र काहीवेळेस त्याला हिंसक रुप मिळते. त्यामुळे शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी उभे केलेले लोखंडी अडथळे आंदोलकांनी हटवले अणि मोर्चा पुणे सरकला. पाण्याचे बॅरिअर पोलिस मुख्यालयाबाहेर ओतून देण्यात आले.

ब्रिटन आणि चीनमधील करारानुसार हॉंगकॉंग 1997 साली चीनकडे सोपवण्यात अले आहे. पण चीनकडून दडपशाही आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवले जाण्याच्याविरोधात हा असंतोष भडकला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)