प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – थोर विचारवंत, लेखक, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत आपल्या लेखणी-वाणीतून मोलाची भूमिका बजावणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीदिनी (दि. 1 ऑगस्ट) अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांचे विचार आणि पोवाडे गायनातून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणेकरांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. यानिमित्त पुणे महानगरपालिकेतील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहातील अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
भगवानराव वैराट यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोहंमद शेख, काशिनाथ गायकवाड, चंद्रशेखर पिंगळे, सुरेखा भालेराव, उज्वला भोसले उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना : जिव्हाळा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अनिल राणे, रवींद्र बनसोडे, अनिकेत कांबळे, ऋषिकेश तुपेरे उपस्थित होते.
क्रांतिगुरू लहुजी साळवे महासंघ : अध्यक्ष प्रकाश वैराट यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पुणे शहराध्यक्ष शैलेश आवळे, एकनाथ चांदने, बाळासाहेब मोहिते, संतोष सरोदे, अरविंद वाघमारे उपस्थित होते.
कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग : शहर उपाध्यक्ष ऍड. मोनिका गावडे-खलाने यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
एआयएमआयएम : पक्षाचे शहराध्यक्ष शाहिद शेख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला. यावेळी पुणे शहर कार्याध्यक्ष निनाद धेंडे, आजिम गुडाकवाला, साबिर शेख, मुबिन खान, सुमैया पठाण उपस्थित होते.
दलित पॅंथर ऑफ इंडिया : संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब भोसले यांनी लोकशाहिरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष इलियाज शेख, मुन्ना पठाण, राहुल भोसले, सागर भालेराव, जहिर शेख उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुणे कॅन्टोमेंन्ट : पक्षाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जयकुमार राघवाचारी, संतोष गायकवाड, हर्षद शेख, सागर शेडगे, विनोद शेडगे, महेंद्र कांबळे उपस्थित होते.
दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोसायटीचे अध्यक्ष, डी.टी. रजपुत आणि संस्थेचे सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता भोसरेकर, काजल शेवाळे, शिल्पा भोसले, अशोक कासुळे, सचिन भालेराव, विलास गायकवाड, शिवाजी माने उपस्थित होते.
विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान : अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारत शिंदे, हर्षदा चौरे, पंचशील चौरे, जया पोळ, दीपक जावळे, राजु भांड उपस्थित होते.
शहर-जिल्हा कॉंग्रेस कमिटी : ज्येष्ठ नेते उल्हास पवार व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते.
रा.स्व. संघ : अण्णा भाऊ साठे यांना घोष वादनासह अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगर कार्यवाह महेश करपे, मकरंद ढवळे, अभय ठकार, सचिन भोसले, विजयराव पानगावे, प्रशांत यादव, सुनील भंडगे, शाखास्तरावरील अनेक स्वयंसेवक, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, साहित्यिक उपस्थित होते.
भाजप पुणे शहर : चिटणीस सुनील माने यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजीनगर भाजप सरचिटणीस आनंद छाजेड, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार आदि उपस्थित होते.