द्राक्षांचा हंगाम सुरू; 10 ते 20 टक्‍के अधिक भाव

दररोज 15 ते 20 टन द्राक्षांची मार्केट यार्डात आवक

 

पुणे – द्राक्षांचा हंगाम सुरू झाला असून मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज सुमारे 15 ते 20 टन द्राक्षांची आवक होत असून, आणखी आवक वाढणार आहे. दरम्यान, एप्रिलपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे.

हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीस 10 ते 20 टक्‍के अधिक भाव मिळत आहे. आकाराने मोठ्या आणि चवीने गोड असलेल्या जम्बो द्राक्षांना जास्त मागणी आहे. अलीकडच्या काळात याच द्राक्षांची लागवड जास्त होत आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महंकाळ तालुक्‍यातून पांढऱ्या द्राक्षाची, तर जिल्हातील नारायणगाव, बारामती भागातून आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून जम्बो अर्थात काळ्या द्राक्षांची आवक होत आहे.

द्राक्षांचा प्रकार घाऊक बाजारात दर्जानुसार मिळणारा भाव
जम्बो (10 किलो) – 600 ते 900
कृष्णा शरद (10 किलो) – 600 ते 1000
सोनाका सुपर (15 किलो) – 700 ते 1100
माणिक चमण (15 किलो) – 600 ते 700
थॉमसन (15 किलो) – 500 ते 700

मागील वर्षी करोनाच्या परिस्थितीचा फटका द्राक्षाला बसला होता. त्यामुळे यावर्षी द्राक्षांकडून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हवामानही पिकास अनुकूल आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, लोणावळा, कोकण आदी पर्यटन भागातून आणि गोवा, गुजराथ, बेंगळुरु, कोलकाता आणि दिल्ली येथून द्राक्षांना चांगली मागणी आहे.

– अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.