रौनक साधवानीला ग्रॅंडसाम्टर नॉर्म

नागपुर: बुद्धिबळाचा राजा विश्‍वनाथन आनंदलादेखील आव्हान देणारा युवा बुद्धिबळपटू रौनक साधवानी याने इंग्लंडमधील स्पर्धेत वयाच्या तेराव्या वर्षी ग्रॅंड मास्टर नॉर्म मिळविण्याची कामगिरी केली आहे.

रौनक आता देशाचा 65 वा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. इतक्‍या कमी वयात हा नॉर्म पूर्ण करणारा जगातील नववा बुद्धिबळपटू ठरला आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या डग्लस येथील फिडे ग्रॅण्ड स्वीस बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्म पूर्ण केला आहे.

रौनकने ग्रॅण्डमास्टरसाठी आवश्‍यक असलेला दुसरा नॉर्म फ्रान्समधील पोर्टिको येथील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पूर्ण केला होता.

ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद विरुद्ध खेळताना रौनकने काही उत्तम चाली रचत आनंदला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. या लढतीत रौनकचा खेळ पाहुन आनंदने त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.