supriya sule | pratibha pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार रंगत येऊ लागली आहे. दोन्ही पवार कुटुंबीय मतदारसंघात फिरताना दिसत आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही युगेंद्र पवार यांचा घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.
यावरूनच अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला आणि विधानसभा निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार की, तु्म्हाला एवढा काय नातवाचा पुळका आला होता, त्या नातवाचा?, असे अजित पवार म्हणाले होते. प्रतिभा पवार सध्या गावागावात प्रचार करीत आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या, “माझी आई कुठलीही भावनिक आव्हान करत नाही. आई लोकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंतचे सगळ्यांचे तिचे ऋणानुबंध संबंध आहेत’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “एक लक्षात ठेवा मुलं हे दूध असतं आणि नातवंड हे दुधावरची साय असतात. आजीला दुधावरची साईच मुलापेक्षा नातवावर प्रेम असतं. आमचं कुटुंब जॉईंटच आहे. पण रेवती प्रिय आहे.
माझं देखील तसंच आहे. मी घरी आले की सुप्रिया घरी आले पण रेवती घरी आली की अरे रेवती घरी आली. कुठल्याही आजोबांना आपल्या मुलापेक्षा नातवंडच प्रिय असतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले….
शरद पवार यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रतिभा पवार प्रचारात दिसायच्या मात्र नंतर त्या प्रचार करताना दिसल्या नाहीत. मात्र यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत.
यावर अजित पवारांनी भाष्य केलंय. काय नातवाचा पुळका आलाय कळेना. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे. आता वेळ नाही विचारण्याची. त्यांना विचारणार आहे की प्रचाराचा एवढा का पुळका आला होता?, असं अजित पवार म्हणाले.