अज्ञात वाहनाच्या धडकेत आजी-नातीचा मृत्यू

नगर  – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील 55 वर्षीय महिलेसह साडेतीन वर्षाची मुलगी ठार झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन हॉटेलजवळ शुक्रवारी (दि.31) रात्री 8 वाजल्याच्या सुमारास घडली.

मधुकर ठोकळ (वय- 58, रा.कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा मधुकर ठोकळ (वय-55, रा.कामरगाव, ता.नगर) व त्यांची नात ईशा अमोल ठोकळ (वय – साडेतीन वर्ष) यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरुन नगरहुन कामरगावकडे जात होते. ते येथील स्माईल स्टोन या हॉटेलजवळ आले असता समोरुन येणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत आशा ठोकळ व ईशा ठोकळ यांचा मृत्यू झाला. तर मधुकर ठोकळ हे किरकोळ जखमी झाले.

अपघात होताच संबंधित अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावरील नागरिक अपघात होताच मदतीकरीता धावले. त्यांनी जखमींना उपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा ठोकळ व ईश ठोकळ मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, याबबात अधिक तपास पो.ना.मरकड हे करीत आहेत. शनिवारी (दि.1) दुपारी या आजी नातीवर कामरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.