दादा,योग्य वेळी योग्य निर्णय घेतला – चित्रा वाघ

Madhuvan

पुणे : राज्यातील राजकारणा एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांनी अजित पवार याचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलं आहे. तसेच दादा, तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री होणार असं वाटत असताना आज सकाळी राज्यात राजकीय भूंकप पहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली. राजभवनात शनिवारी सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सत्तेसाठी आता बहुमत सिद्ध करण्याची परिक्षा असणार आहे. त्यासाठी फडणवीस सरकारला येत्या 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.