तंदुरुस्तीसाठी चेन्नईच्या आजींचे वेटलिफ्टिंग

चेन्नई  -एक वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातातून सावरत असताना शारीरिक तंदुरुस्तीही जपली जावी, यासाठी येथील 83 वर्षांच्या आजी चक्‍क वेट लिफ्टिंग करत आहेत.

या आजींचे नाव किरण असून जीम ट्रेनर असलेल्या त्यांच्या नातवानेच या आजींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्याला प्रचंड लाइक्‍स मिळत आहेत.

या आजींना लहाणपणापासून खो खो, कबड्डी या खेळातच कारकीर्द घडवायची होती. मात्र, कुटुंब आणि भावपाशामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, जे वयाच्या तिशीत ज्यांना जमत नाही तेच किरण आजी वयाच्या 73 व्या वर्षा लिलया करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.