हेमामालिनी झाल्या आजी! मुलीने दिला जुळ्या बाळांना जन्म

पुणे – हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहाना देओल-व्होरा हीने 26 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आहाना आणि तिचे पती वैभव व्होरा यांनी त्यांचे नामकरण अस्ट्राईया आणि आदिया असे केले आहे.

आहानाने तिच्या व्हेरिफाईड नसलेल्या इस्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे. त्यात ती म्हणते, काही चमत्कार दुपटीने अनुभवयास येतात, आम्हांला अस्ट्राईया आणि आदिया अशा जुळ्या कन्यारत्नांची प्राप्ती झाली आहे.

बॉलिवुडमधील एकेकाळची अभिनेत्री ईशा देओलची लहान बहीण असलेल्या आहानाचा विवाह 2 फेब्रुवारी 2014 रोजी उद्योजक वैभव व्होरा यांच्याशी झाला आहे. याआधी त्यांना जून 2005 मध्ये मुलगा झाला आहे. त्याचे नाव डॅरियन असे ठेवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.