मांडवगण फराटा -नागरगाव (ता. शिरूर) येथे लग्न समारंभात सहभागी झालेल्या एका 70 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती निमोणे आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा डनियल यांनी दिली.
शिरूरचा पूर्व भाग नुकताच करोनामुक्त झाला होता. मात्र, नागरगाव येथे पुन्हा रुग्ण आढळल्याने करोनाने पुन्हा एकदा पूर्व भागात शिरकाव केला आहे. संबंधित 70 वर्षीय आजी 20 दिवसांपूवी नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती.
लग्नाहून परत आल्यानंतर गेल्या सात दिवसापासून सदर महिलेला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळली होती. त्यांची विश्वराज हास्पिटल येथे करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल शुक्रवारी (दि. 10) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आजीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.
त्याचबरोबर कंन्टेमेंट झोन निश्चित करून त्या परिसरात औषध फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच मनिषा शेलार यांनी
केले आहे.