लखनौ – वाचन करण्यासाठी आणि शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते असे सांगितले जाते. तर अनेकांनी हे सिद्ध देखील करून दाखवले आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील 92 वर्षीय आजी शाळेत जाऊ लागल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. या आजीची खूप चर्चा होत आहे. एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती आजी एका लहान मुलासोबत वर्गात बसलेली दिसत आहे.
सलीमा खान असे आजीचे नाव आहे. सलीमा आजी सहा महिन्यांपासून शाळेत येत असून त्या चांगला अभ्यास करत आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शर्मा सांगतात, “8 महिन्यांपूर्वी सलीमा आजी माझ्याकडे आली आणि त्यांनी अभ्यास करण्याची इच्छा सांगितली. वृद्धांना शिक्षण देणे ही जबाबदारी आहे, त्यांचा दृढनिश्चय पाहून त्यांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली.”
92 वर्षांच्या सलीमा खान शाळेत जाऊ लागल्या –
काही कारणास्तव सलीमा आजीला लहानपणी अभ्यास करता आला नाही पण आजीला आता अभ्यास करायचा आहे. त्यांचा नातू त्यांच्याकडून जास्त पैसे घेतो आणि त्या अशिक्षित आहेत म्हणून त्यांना समजत नसायचे, असे त्याने सांगितले. यानंतर सलीमा आजीने अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत जाऊ लागली.
UP : 92 साल की महिला पढ़ने के लिए प्राइमरी स्कूल पहुंची।
वीडियो बुलंदशहर का बताया जा रहा है। pic.twitter.com/ybT2Tm4W0e— Ravi Kumar Rathore (@rrjansaamna) September 27, 2023
रविवारी 24 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या राक्षर भारत अभियानांतर्गत सलमा आजीने नवसाक्षर होण्यासाठी परीक्षा दिली आणि आजी उत्तीर्णही झाली. आधी सलीमा आजीला मोजमाप येत नसे. त्यांचे नावही त्यांना लिहिता येत नव्हते. आता त्या एक ते शंभर पर्यंत संख्या मोजू शकता आणि त्यांचे नाव देखील सहज लिहू शकतात. सलीमा आजीने सांगितले की, पहिल्यांदा परीक्षा दिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला.
सोशल मीडियावरही सलीमा आजीचे खूप कौतुक होत आहे. परीक्षा केंद्रावर बसलेल्या सलीमा आजीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही लोक त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत तर काही लोक अशा ज्येष्ठांचे मनोबल वाढवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करत आहेत.