कणकवली एस.टी. आगाराच्या आवारात भव्य व्यापारी केंद्र उभारणार

परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी  : राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी कणकवली एस.टी. आगाराला भेट देवून आगाराची पाहणी केली. सध्या कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे एसटीची परिस्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीत एसटीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कणकवली येथील एसटीच्या 7 एकर जागेमध्ये बसस्थानक, बस आगार व एस.टी. विभागीय कार्यालयाबरोबरच येथे भव्य व्यापारी उद्योंग केंद्र उभारण्यात येणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, भविष्यात कणकवली शहर हे उद्योग व व्यापारी दृष्टीकोनातून मोठे होऊन एस.टी. महामंडळालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कणकवली शहरातील बाजारपेठही आजूबाजुच्या सर्व खेड्यापाड्यातील गावांचा केंद्रबिंदू असल्याने त्याचा व्यापारी दृष्टीकोनातून जिल्ह्याला फायदा होईल. यावेळी एस.टी. चे विभागीय नियत्रंक प्रकाश रसाळ, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.