नवी दिल्ली : देशाची कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्याचे दिसत आहे. त्यातच राजधानी दिल्लीतही कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. रोज कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण दिल्लीत आज रात्रीपासून पुढच्या सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
Delhi likely to be under curfew for seven days. Announcement expected shortly. #COVID19 pic.twitter.com/OTlLHR3NLl
— ANI (@ANI) April 19, 2021
रविवारी दिल्लीत एका दिवसात 25,462 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि त्यातील पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्क्यांवर पोहचला आहे. संसर्गाचे प्रमाण २९.७४ टक्के आहे. याचा अर्थ दिल्लीत जवळजवळ प्रत्येक तिसरा व्यक्ती संक्रमित असल्याचे दिसून आले आहे.
दिल्लीमध्ये यापूर्वीच शनिवार व रविवार कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचवेळी नुकतेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, शहरात 100 पेक्षा कमी आयसीयू बेड शिल्लक आहेत. त्यातच सरकारी शाळा ह्या कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.