पंढरपूर मध्ये देशी कट्टा सहीत पाच जिंवत काडतुसे जप्त

पंढरपूर: शहरात ऐन गौरी गणपती सणाच्या काळातच शहरातील एका कडून एक  गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी शिवराज उर्फ भैय्या बाळासाहेब ननवरे या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सध्या शहरात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे पोलिसांमोर आव्हान असतानाच एका व्यक्तीकडे गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूसे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे शहरात बेकायदा शस्त्रे बाळगण्याचे प्रकार ही या निमित्तने समोर येवू लागले आहेत. शहरातील वाढत्या अवैध धंद्यामुळे पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढल्याची परिस्थिती आहे. रविवार मध्यरात्री संत गजानन महाराज मठा जवळच्या वाहन पार्किंग आवारात ही कारवाईकरण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.