– ज्ञानेश्वर फड
परभणी – आदर्शगाव खादगाव (ता. गंगाखेड, जि. परभणी) सरपंचपदी सवित्रीताई राजेश फड तर उपसरपंचपदी वैजनाथ व्हावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गावची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
यावर्षी राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवणूका बिनविरोध झाल्या आहेत. आदर्शगाव खादगावनेही निवडणूक बिनविरोध करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात सर्व ग्रामस्थ आणि राजेश फड (जि. प. सदस्य), रामराजे फड (शैक्षणिक संस्था अध्यक्ष), दिलीप फड (अध्यक्ष – स्वस्त धान्य दुकानदार संघटना) यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणारी सर्व विकास कामे, प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ व सुंदर आदर्शगाव खादगाव करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस नवनिर्वचित सरपंच, उपसरपंच यांनी बोलून दाखविला आहे.
आदर्शगाव खादगाव ग्रामपंचायत सदस्यांची नावे –
1) भगीरथ सायस फड
2) दिलीप बळीराम फड
3) उत्तम शंकर व्हावळे
4) लिंबाबाई श्रीवंत फड
5) रुक्मीनबाई अंगद फड
6) गयाबाई बापूराव गायवळ
7) रत्नमाला भागवत दहिफळे