ओझर : श्री विघ्नहर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्यावतीने जुन्नर तालुका क्रीडा संघटना व श्री विघ्नहर विद्यालय ओझर आयोजित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. यात विघ्नहर विद्यालयाने चॅम्पियनशिप मिळविली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर दांगट यांनी दिली.
सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या जुन्नर तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत अत्यंत चुरशीचे सामने पार पडले. हे सामने पाहण्यासाठी विविध शाळांमधून विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघ, विघ्नहर विद्यालयाचा स्टाफ, विद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ या सर्वांचे योगदान महत्वपूर्ण असल्याची माहिती पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांनी सांगितले.
या स्पर्धेत विघ्नहर विद्यालयाने १४ वर्षे मुले, १७ वर्षे मुले, मुली यांनी प्रथम क्रमांक तर १४ वर्षे मुली व १९ वर्षे मुली यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करत हॉलीबॉल मधील तालुकास्तरीय चॅम्पियनशिप मिळवली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गणेश राऊत सर यांनी मार्गदर्शन केले आहे. या सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत ओझर नंबर १ व २, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी अशा विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पुढीलप्रमाणे:
१४ वर्षे मुले
श्री विघ्नहर विद्यालय ओझर
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
१४ वर्षे मुली
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
श्री विघ्नहर विद्यालय ओझर
१७ वर्षे मुले
श्री विघ्नहर विद्यालय ओझर
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
१७ वर्षे मुली
श्री विघ्नहर विद्यालय ओझर
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
१९ वर्षे मुले
गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर
१९ वर्षे मुली
गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
श्री विघ्नहर विद्यालय ओझर