वाघोली : वाघोली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी पंडित रेजितवाड यांची तर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी सर्जेराव कुंभार यांची नियुक्ती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन राज्य शासनाने पोलीस आयुक्तालय अंतर्गत नवीन सात पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहेत यात वाघोली साठी सध्या कार्यरत असणारे लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड यांची वाघोलीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वाघोली मध्ये नव्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दूर करण्यासाठी सिंघम अधिकारी दिला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात रेजीतवाड यांनी उत्तम कामकाज केल्यामुळे त्यांची नियुक्ती झाल्याने वाघोलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या उर्वरित गावांसाठी सर्जेराव कुंभार यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून आगामी काळात सामाजिक सलोखा राखून कायदा सुव्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर मोठी जबाबदारी येणार आहे. दोन्ही पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती बद्दल पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.