शिरूर : काळूबाईनगर(कवठे येमाई) ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालकांची पालकसभा संपन्न झाली.मागील व्यवस्थापन समितीचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
यावेळी सर्वानुमते शासननिर्णयानुसार निवड प्रक्रिया पार पडून अध्यक्षपदी संभाजी इचके व उपाध्यक्षपदी शामल इचके यांची निवड करण्यात आली. भौतिक सुविधांच्या बाबतीत शाळा समृद्ध करण्यासाठी व शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी मनापासून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी इचके यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष नितीन इचके,उपाध्यक्षा पल्लवी इचके यांच्या हस्ते नवनिर्वाचित व्यवस्थापन समिती सदस्यांचा सन्मान केला. प्रास्ताविक कैलास पडवळ यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बाबाजी मेचे यांनी मानले.