निमोणे – येथे मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्यावरुन वाद झाल्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे देविदास राधुजी पोटे (वय ५६) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी फिर्याद दाखल केली असुन १) किशोर बाबुराव पतके, २) पुजा किशोर पतके, ३) सानिका किशोर पतके, ४) सविता जगदाळे. ५) सविता संजय कदम. ६) लीलाबाई रावसाहेब मोतीमोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (ता १८) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी देविदास पोटे व किशोर पतके यांच्यात मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला.
यावेळी किशोर पतके याने जमाव जमवत पोटे यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केली. त्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, यांसह शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी निमोणे येथे भेट दिली असुन शिरुर पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.