Gram Panchayat Results 2021 | महाबळेश्‍वर तालुक्‍यात राष्ट्रवादी, शिवसेनेचे वर्चस्व

पाचगणी ( Gram Panchayat Results 2021 ) – महाबळेश्‍वर तालुक्‍यातील निवडणूक घोषित झालेल्या 42 ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 14 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात पोलीस बंदोबस्तात होऊन निकाल घोषित करण्यात आले. त्यामध्ये पूर्वेकडील भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस तर तापोळा भागात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी कार्यालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. तेथे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 11 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तालुक्‍याच्या पूर्वेकडील भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. ( Gram Panchayat Results 2021 )

राष्ट्रवादीचे मातबर नेते बाळासाहेब भिलारे यांनी भिलार येथे, तर जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी राजपुरी या आपल्या गावातील ग्रामपंचायतीतील सत्ता अबाधित राखली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शेलार यांनी सौंदरी व कोट्रोशी या ग्रामपंचायतींवर स्वबळावर भगवा फडकवण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीचे मातबर उमेदवार राजेंद्र भिलारे यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.

निवडणूक निकालानंतर शिवसेनेने 18 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवल्याचा दावा केला आहे. फटाक्‍यांची आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे नेते व महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी जिल्न्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख संतोष जाधव व मान्यवर उपस्थित होते. ( Gram Panchayat Results 2021 )

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.