वडूज ( Gram Panchayat Results 2021 ) – खटाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे, कॉंग्रेसचे रणजितसिंह देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, उपसभापती हिराचंद पवार व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी आपापले गड अबाधित राखले. पुसेगाव, गुरसाळे, एनकुळ, कलेढोण, निढळ या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी परिवर्तन घडवले. ( Gram Panchayat Results 2021 )
निमसोडमध्ये देशमुख गटाने 9, पिंटू मोरे गटाने 5, नंदू मोरे गटाने एक, पळशीत घार्गे गटाने 8, विरोधी गटाने एक, कुमठे येथे पैलवान गटाने सर्व 9, येरळवाडीत भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण गटाने 4, विरोधी गटाने 3, चितळीत राष्ट्रवादीने 10, ऍड. हणमंतराव जाधव गटाने 5, कातरखटावमध्ये जानाई पॅनेलने 6, कात्रेश्वर पॅनेलने 5, दातेवाडीत माजी सरपंच हंगे गटाने 6, धोंडेवाडीत हणमंतराव भोसले यांच्या पॅनेलने 9 पैकी 6, सातेवाडीत ग्रामविकास पॅनेलने 6, जानुबाई पॅनेलने 3, वाकेश्वरमध्ये भैरवनाथ पॅनेलने 6, ज्योतभैरव आघाडीने 2, गोपूजमध्ये राष्ट्रवादीने 9 पैकी 6 जागा जिंकल्या. ( Gram Panchayat Results 2021 )
पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनेलने एनकूळमध्ये 9 पैकी 6 जागा जिंकून परिवर्तन घडवले. अर्जुन खाडे गटाला 3 जागा मिळाल्या. गुरसाळेत राष्ट्रवादीप्रणित पॅनेलने 11 पैकी 9 जागा जिंकून परिवर्तन घडवले. पुसेगावात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने परिवर्तन घडवले. उंबर्डे येथे सुरेश पवार, जयसिंगराव जाधव यांच्या पॅनेलने 5 तर शिवाजी पवार गटाने 4 जागा जिंकल्या.
कलेढोणमध्ये मतदारांनी सत्ताधारी गटाला झिडकारत ऍड. शरद भोसले गटाच्या हातात सत्ता दिली आहेत. खातगुण येथे रामरहीम पॅनेलने 11 पैकी 8 जागा जिंकून परिवर्तन घडवले. रणसिंगवाडीत राष्ट्रवादीने सर्व 7, वरुड येथे दीपक जगदाळे यांच्या पॅनेलने 5 जागा, कळंबीत कंबळेश्वर पॅनेलने 4, भैरवनाथ पॅनेलने 2 जागा मिळवल्या. तडवळेत राष्ट्रवादी, भाजप व डॉ. महादेव पाटील गट यांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्याने त्रिशंकू स्थिती झाली आहे.
खरशिंगेत जयभवानी पॅनेलने 5, जानुबाई पॅनेलने 2 जागा जिंकल्या. येळीवमध्ये सर्व 7 जागा जिंकून हनुमान पॅनेलने परिवर्तन घडवले. बोंबाळेत लोकशाही आघाडीने 6, भैरवनाथ पॅनेलने तीन जागा जिंकल्या. पिंपरीत माजी सरपंच शांताराम सुर्वे गटाने 4 जागा जिंकल्या.
मांडवेत सत्ताधारी जयहनुमान पॅनेलने 5, रयत आघाडीने 3 व नवतरुण पॅनेलने 1, हिंगणेत आ. गोरेप्रणित पॅनेलने 6, शेखर गोरेप्रणित पॅनेलने एक, पेडगावात गावविकास पॅनेलचे तीन, अपक्ष 1, कुमठेत सभापती मांडवे यांच्या पॅनेलचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत.
चिठ्ठीने तारले
पाचवड येथे संगीता घाडगे व वंदना घाडगे यांना प्रत्येकी 318 मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निर्णय होऊन संगीता घाडगे यांना विजयी झाल्या.