शिरूर: करडे तालुका शिरूर येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बांदल यांच्यावर दोघा तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. अंकुश बांदल यांच्यावर हल्ला करून पळून जाणाऱ्या जखमी हल्लेखोराला करडे येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी घटनास्थळापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर पकडले. त्यावेळेस शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळेस जमाव संतप्त होता खानापुरे यांनी जमावाला थांबवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु जमाव ऐकत नसल्याचे पाहिल्यानंतर खानापुरे यांनी पोलिसी खाक्या दाखवत जमावाला शांत केले.
हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंकुश बांदल राहणार कडे तालुका शिरूर जिल्हा पुणे असे जखमी झाले तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर समीर करवंद काळे, सोनगाव बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अंकुश बांदल यांचे करडे रस्त्यावर हॉटेल असूनया हॉटेल जवळच आज सायंकाळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. हल्ला का व कशातून झाला याबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळाली नाही. यातील आरोपी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तोही जखमी असल्यान त्याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अंकुश बांदल यांच्या गळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने असते त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला का काय अस संशय पोलिसांना आहे. हल्ला झाल्यानंतर आरोपी पळून जात असताना त्याला स्थानिक नागरिकांनी पकडले वेळीच शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे घटनास्थळी पोचले त्यामुळे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले कुठला अनर्थ यावेळी झाला नाही. आरोपी हा बाहेर गाव चा असल्याचे बोलले जात आहे.
घटनास्थळी दौंड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक ऐश्वर्या शर्मा व पुणे ग्रामीणचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.