पुणे – जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. मात्र, या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नव्हते. आता जिल्हा प्रशासनाने सरपंच पदाचे आरक्षणाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.29 जानेवारी) तालुक्याच्या ठिकाणी ही सोडत होणार आहे.
त्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे उघड होणार आहे, ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.