कोंढवा – कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले आहे, आपला संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या घरकाम करणारे महिला, बांधकाम मजूर, कामगार वर्ग अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जात होते.
अशा कामगार वर्गाला मदत करण्याचे गणपत दगडे युवा मंच व भाजपा पुणे जिल्हाउपअध्यक्षा महिला मोर्चा स्नेहल गणपत दगडे व भाजपा मध्य हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने पिसोळी परिसरात गरजू लोकांना सोशल डिस्टंसिंग चे भान ठेऊन प्रातीनिक स्वरुपात ११ कुटुंबाला देऊन व इतर ९८९कुटुंबांना घर पोच, गहू पीठ ५ किलो, तांदूळ ३ किलो,तूरडाळ १ किलो,तेल १ किलो, मसाला, मीठ लहान मुलासाठी बिस्कीट ,व जीवनावश्यक वस्तूंचे ११ कुटुंबांना कोंढवा पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड, सर्कल व्यंकटेश चिर्मुला यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत,११ (एकोणीस) जेष्ठ नागरिकांना २५% सवलतीच्या दरात अत्यावश्यक औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. अशा आपत्कालीन परिस्थितीत समाजातील अनेकजण पुढे येत मदतकार्य करत आहे, केंद्र तसेच राज्य सरकार आपापल्या परीने समाज जागृती व गरजूंना मदत करतच आहेत.
त्याचबरोबर समाजासाठी आपले कर्तव्य समजून काम केले पाहीजे व सर्वांनी घरातच राहून लाॅकडाऊनचे काटेकोर पालन ही करावे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व वाटप करनेसाठी भाजपा मध्य हवेली अध्यक्ष धंनजय कामठे, पिसोळीचे सरपंच मचिंद्र दगडे, उपसरपंच दिपक धावडे, सचिन निबांळकर, सोमनाथआबा दगडे,मारुती दगडे,दतात्रय दगडे,भाजपा युवा मोर्चा सचिन हांडे,लहु दगडे,बाळासाहेब घोडके,राजु धावडे,रोहित धावडे,पन्नालाल निकम,राजु ससाणे भाऊ तुपे व इतरानी परिश्रम घेतले.