पुणे – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानिमित्त राष्ट्रीय शोक व दुखवटा जाहीर केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ स्थगित करण्यात आला होता. आता हा सोहळा गुरुवारी (दि. 10) होणार आहे.
हा समारंभ ऑनलाइन होणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले आहे.