“लगान’ला 20 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आसिरने व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पण यामध्ये ग्रेसी सिंगचा कोठेच नामोल्लेख नव्हता. सध्या ग्रेसी कोठेच दिसत नाही. याबद्दल तिला खोदून खोदून विचारले तर आपल्याला आता विशेष महत्त्वाकांक्षा उरली नसल्याचे तिने सांगितले.
“लगान’ आणि “मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ हे दोन मोठे हिट सिनेमे आपल्या नावावर जमा झाल्यावर करीअरसाठी आटापिटा करण्याची तिला गरज वाटत नाही. तिचे एक जोशी नावाचे मॅनेजर होते. ते तिच्यासाठी सिनेमांच्या चांगल्या ऑफर शोधून काढायचे. मात्र 2008 साली ते वारले. त्यानंतर ग्रेसीने नवीन सिनेमांसाठी निर्मात्यांच्या मागे मागे जाणे सोडून दिले. सध्या तर तिला वर्तमानकाळातच रहाणे आवडते आहे.
आता तर तिला लग्नाचे वेध लागले आहेत. बॉलीवूडमधील कोणत्याही ऍक्टरबरोबर ग्रेसीचे नाव डेटिंगसाठी जोडले गेलेले नाही. त्यामुळे अर्थातच तिच्या अफेअरचीही कधीच चर्चा झाली नाही. पण आता तरी लग्नासाठी योग्य वेळ आली आहे, असे तिला 2020 पर्यंत वाटत नव्हते. आणखीन 2 वर्षे थांबायची तिची तयारी होती. म्हणजे कदाचित पुढच्या वर्षी ती नक्की लग्न करेल.