कर्जबाजारी जेट कंपनीच्या संचालक मंडळावरून गोयल दाम्पत्याचा राजीनामा 

मुंबई – कर्जबाजारी जेट एअरवेज कंपनीच्या संचालक मंडळावरून या कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी राजीनामा दिला आहे. गुंतवणुकदारांनी त्यांना संचालक मंडळावरून पायउतार होण्यास भाग पाडले त्यानुसार त्यांनी हे राजीनामे सादर केले असल्याचे वृत्त आहे.

आर्थिक अडचणीमुळे जेट विमान कंपनी मोठ्याच अडचणीत आली असून या कंपनीवर सुमारे 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. त्यामुळे विमान कंपनी चालवणे त्यांना अशक्‍य बनले आहे. लीजवरच्या अनेक विमान कंपन्यांचे भाडे देणे जमले नाही म्हणून ही विमाने सध्या बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांचे वेतनही थकले आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. या विमान कंपनीकडे एकूण 119 विमाने आहेत त्यातील 54 विमाने भाडे न दिल्याने बंद असून 24 विमाने मेंटेनन्सच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. गोयल दाम्पत्याने सन 1993 साली ही विमान कंपनी सुरू केली होंती.

Leave A Reply

Your email address will not be published.