केंद्र सरकारकडून आणखी 43 अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली – केंद्र सरकारनं भारतातील आणखी 43 मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 69 ए नुसार भारताचं सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे.

बंदी घातलेले सर्व अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित अॅप आता वापरता येणार नाहीत, असं देखील स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अॅप्सची यादी खालीलप्रमाणे –  

अली सप्लायर्स मोबाईल अ‍ॅप, अलिबाबा वर्कबेंच, अली एक्सप्रेस, अलिपा कॅशिअर, लालामूव इंडिया, ड्राईव्ह विथ लालामोव इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड-बिझिनेस कार्ड रीडर, कॅम कार्ड- बीसीआर वेस्टर्न, साऊल, चायनजी सोशल, आशियन डेट, फ्लर्ट विश, गायज ओनली डेटिंग, टूबिट, वी वर्क चायना, फर्स्ट लव लाईव्ह, रीला, कॅशिअर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजीटीव्ही, वी टीव्ही, वीटीव्ही लाइट, लकी लाईव्ह, टाओबाओ लाईव्ह, डिंग टॉक, आईडेंटिटी वी, आयसोलँड 2, बॉक्स स्टार, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, मंचकिन मॅच, कॉनक्विस्टा ऑनलाइन 2.

दरम्यान, याआधी सरकारने दोन वेळेस अॅप्सवर बंदी घातलेली आहे. सरकारने 29 जून रोजी चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती. तर 2 सप्टेंबरला 118 अॅपवर बंदीची कारवाई केली होती. यामध्ये पबजीसह टिकटाॅक, वी चॅट, लुडो, वॉल्ट आणि मोबाईलमधील फोटो लपवण्यासाठी वापरले जाणारे गॅलरी वॉल्ट, गॅलरी लॉक या अॅप्सचा समावेश होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.