बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात झाला आहे. बुधवारी रात्री त्याच्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीने धडक दिली आहे. कारमध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि ड्रायव्हर होते. धडक देणारी कार ही यशराज बॅनरची असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुहू पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या गाडीने धडक दिली आहे ती गाडी ड्रायव्हर चालवत होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच दोनही गाड्यांचे फारसे नुकसान झालेले नाही. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर गोविंदा शेवटचा 2019मध्ये आलेल्या रंगीला राजा या कॉमेडी सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. तर अभिनेता गोविंदाची मुलगी टीना आहूजा सोशल मीडियावरही खूपच ऍक्टिव असते. ती सतत आपले फोटो शेअर करत राहते. टीनाने आपल्या नवीन म्यूझिक व्हिडिओ प्रमोशनसाठी टिक-टॉकवरही डेब्यू केले होते. टीनाची वाढती लोकप्रियता पाहता तिचे नाव लवकरच स्टार अभिनेत्रींच्या यादीत येउ शकते.