मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शतकी वर्षात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यपालांनी पुरंदरे यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Warm felicitations and heartiest greetings to Shiv Shahir Babassaheb Purandare on his 100th birthday. Wishing him a long life and the best of health💐💐
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 29, 2021
“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शतकी वर्षातील पदार्पणानिमित अभिष्टचिंतन आणि दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे राज्यपालांनी आपल्या ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.