नवी दिल्ली : मोठे प्रशासकीय बदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी गिरीशचंद्र मार्मू यांची जम्मू काश्मिरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. तर लडाख उपराज्यापालपदाचा भार राधाकृष्ण माथूर यांच्यावर सोपविण्यात आला.
सध्याचे जम्मू काश्मिरचे राज्यापाल सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली. जम्मू -काश्मिर आणि लडाख असे विभाजन केल्यानंतर प्रथमच त्यांना स्वतंत्र राज्यपाल देण्यात आले आहेत.
पीएस श्रीधरन पिल्लाई यांची मिझोरामच्या राज्यपालपदावर नियुक्ती केली असून शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांणी या नियुक्त्यांची घोषणा केली. 1985च्या भाप्रसेवेतील तुकडीतील मार्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. मोदी मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे मुख्य सचिव होते.