Delhi : राज्यपाल बैस यांनी घेतली गृहमंत्री शाहंची सदिच्छा भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची बुधवारी (दि.1) दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल बैस यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली.