मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या परोपकार, प्रेम, दया व करुणेच्या शिकवणीचे स्मरण देतो.
नाताळचा पवित्र सण जीवनातील अंध:कार, निराशा व दु:ख दूर सारो व सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी मी प्रार्थना करतो.
राज्यपाल @BSKoshyari यांनी जनतेला नाताळ तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा पवित्र सण जीवनातील अंध:कार, निराशा व दु:ख दूर सारो व सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. pic.twitter.com/6H4XPUIU5Y
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 24, 2021
नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२२ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.