तरुण गोगोई यांच्या निधनानंतर राज्यपालांनी व्यक्त केला शोक

मुंबई  – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

तरुण गोगोई हे आसामचे यशस्वी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते होते. मुख्यमंत्रीपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी आसामच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे आसामने तसेच देशाने एक अनुभवसंपन्न व अभ्यासू नेता गमावला आहे.  गोगोई यांना श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.