मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्याचं दिसून आल आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते.
उत्तर प्रदेशात उद्योग स्नेही वातावरण तयार व्हावं आणि गुंतवणूक वाढावी यासाठी योगींचा मुंबई दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट देखील झाली.
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवप्रतिमा भेट दिली. त्यावेळी त्यांनी पायाचील चपला काढलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा हाच फोटो शेअर करत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालुन जर “शिवप्रतीमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? pic.twitter.com/aiERpQUNGK
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 6, 2023
अमोल मिटकरी म्हणाले की, “राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा. बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालुन जर ‘शिवप्रतीमा’ देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? असं ते म्हणाले आहेत.