पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वयाच्या ८० व्या वर्षी सिंहगडावर चालत पोहचले आहेत. यावेळी गडावर राहणाऱ्या नागरिकांनी राज्यपालांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्याचे पहायला मिळाले आहे. गडावर ठिकठीकांना त्यांचे स्वागत देखील करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गड, किल्ले पर्यटकांसाठी बंद आहेत. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगडावर गेले आहे. विशेष म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी चालत सिंहगड गाठले त्यामुळे सर्वानाच त्यांचे आश्चर्य वाटले.
यावेळी गडावरील महिलांनी राज्यपालांना ओवळत तसेस टीळा लावून त्यांचे गडावर स्वागत केले आहे. राज्यपालांनीही नम्रपणे हात जोडून नमस्कार करत, हसत हसतच स्थानिकांकडून करण्यात आलेलं हे स्वागत स्वीकारल्याचे बघायला मिळाले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी मागील वर्षी याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट २०२० शिवनेरी किल्ली सर केला होता. पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत.