नवी दिल्ली – मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, देशातील तेलाच्या किमतीतील वाढ ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आहे. ते म्हणाले की, देशात तेलाच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 13 वेळा वाढल्या आहेत. दरम्यान, दोन्ही इंधन 9.20 रुपयांनी महागले आहे.
इतर देशांच्या किंमती –
लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, भारतातील इंधनाच्या किमतीत वाढ ही इतर देशांतील किमतींच्या 1/10 टक्के आहे. एप्रिल 2021 ते 22 मार्च दरम्यान, गॅसोलीनच्या (पेट्रोल) किमती अमेरिकेत 51 टक्क्यांनी, कॅनडामध्ये 52 टक्के, जर्मनीमध्ये 55 टक्के, यूकेमध्ये 55 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के, स्पेनमध्ये 58 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र यांच्या तुलनेत भारतात केवळ पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
22 मार्चपासून सातत्याने वाढ –
दिल्लीत पेट्रोलचा दर आता 104.61 रुपये प्रतिलिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 95.87 रुपये झाला आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय कोलकाता पेट्रोल 114.28 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर, तर चेन्नईमध्ये 110.11 रुपये आणि डिझेल 100.19 रुपये प्रति लिटर झाले आहे. विशेष म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 4 नोव्हेंबर 2021 पासून 21 मार्च 2022 पर्यंत स्थिर होत्या. 22 मार्चपासून त्यात वाढ होऊ लागली, ज्यामुळे देशातील सामान्य लोकांवर हळूहळू बोजा वाढत आहे.