नवी दिल्ली – पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने अलायन्स एअर एव्हिएशन बरोबर सामंजस्यकरार केला. पर्यटन मंत्रालय भारताला जगात एक पसंतीचे पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तर अलायन्स एअर एव्हिएशन त्याच्या विशाल नेटवर्कसह भारतात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावत आहे.
संयुक्तपणे देशांतर्गत प्रोत्साहनाचे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि पर्यटन विषयक बाजारपेठांमध्ये पर्यटन मंत्रालय आणि अलायन्स एअर एव्हिएशन कामकाजात समन्वय साधण्याची गरज लक्षात घेऊन या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
पर्यटन मंत्रालयाच्या वतीने अतिरिक्त महासंचालक रुपिंदर ब्रार आणि अलायन्स एअर एव्हिएशनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत सूद यांनी करारावर स्वाक्षरी केली.
अलायन्स एअर भारत सरकारच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेला प्रोत्साहन देण्यात आघाडीवर आहे. एकात्मिक विपणन आणि प्रोत्साहनात्मक धोरण तसेच अलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडच्या संयुक्त सहकार्याने एकत्रित मोहीम राबवणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.