‘विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ उठविण्याचा सरकारचा डाव?’

मुंबई: शेतकऱ्यांना मोफत वीजेची भेट देण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची थकबाकी २२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली असून दुष्काळामुळे वीजबिल वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलून मोफत वीज पुरविल्यास विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ उठविण्याचा सरकारचा डाव? असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट लिहली आहे, “महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्याला कर्जमाफी आणि मोफत वीज मिळते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागते, अशी दुदैवी परिस्थिती राज्यातल्या शेतकऱ्यावर ओढावली आहे. तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच केली होती.

मात्र, या सरकारने त्यावेळी कोणतीच ठोस पाऊले उचलली नव्हती. आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र शेतकऱ्यांना मोफत वीजेची भेट देऊन राजकीय लाभ उठविण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. मुळात या सरकारने महाराष्ट्रात कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे ही मोफत वीज ही देखील फसवी घोषणाच ठरणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.