बजेटमध्ये घोषणा करून लोकांना फसवण्याचा सरकारचा प्रयत्न -अजित पवार

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जानेवारीपासून निर्धार परिवर्तनाचा यात्रा सुरू केली. कोकण, विदर्भातील बुलडणा जिल्हा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता विदर्भातही ही परिवर्तन यात्रा जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पत्रकारांनी केंद्र सरकारच्या बजेटविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बजेटमध्ये बरेच काही देऊन जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी, बेरोजगार, यांच्यासाठी भरपूर काही जाहीर होईल. पण यातले काहीच होणार नाही. लोकांना फसवण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, असे पवार म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीकविम्यातही मोठा भ्रष्टाचार आहे. पीकविम्याच्या नावाखाली विम्याचे पैसे कंपन्यांच्या घशात जातात हे मी पुराव्यानिशी सिद्ध करेन, असे आव्हानही पवार यांनी दिले.

त्यामुळेच हे सरकार उलथवून टाकण्यासाठी ही परिवर्तनाची यात्रा काढण्यात आली आहे आणि हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय परिवर्तन संपर्क यात्रा थांबणार नाही, असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)