fbpx

वेळेवर EMI भरलेल्यांना ५ तारखेपर्यंत कॅशबॅक; पण किती? जाणून घ्या कॅशबॅकचं ‘गणित’…

कर्जहफ्ते नियमित भरलेल्यांची दिवाळी प्रकाशमान!!!

नवी दिल्ली – करोनाव्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड19 च्या लॉकडाऊनच्या काळात (मॉरेटोरियम पिरियड) ज्या नागरिकांनी आपल्या कर्जांचे हप्ते वेळेवर भरले आहेत, त्यांना कॅशबॅकसह अन्य काही लाभ देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते.

मात्र, हे लाभ नक्की केव्हापर्यंत मिळणार याविषयी त्यावेळी काही सांगण्यात आले नव्हते. तर अशा प्रामाणिक कर्जदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, असा कॅशबॅकचा लाभ दिवाळीपूर्वी 11 दिवस आधी म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या बॅंकखात्यात जमा केले जाणार आहेत. हा निर्णय केंद्रिय अर्थ मंत्रालयाने घेतला असून, त्याला 21 ऑक्‍टोबर 2020 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी : अनलाॅक 5.0ची मुदत वाढवली; कंटेन्मेंट झोनमध्ये ‘लाॅकडाऊन’ सुरूच राहणार

यासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, कर्जावरील चालू व्याजदर आणि व्याजावरील व्याज (चक्रवाढ व्याज) यामधील फरकाची रक्कम त्या त्या कर्जदाराच्या खात्यामध्ये 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत जमा केली जाईल.

या प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, दि. 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत विशिष्ट कर्जखात्यांतील कर्जदारांना व्याजमाफी योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजेच ज्या काळांत कर्जावरील हफ्ते न भरण्याची केंद्र सरकारने मुभा दिली होती, त्या काळातही (मॉरेटोरियम पिरियड) ज्यांनी आपले हफ्ते वेळेवर भरले आहेत, असे कर्जदार हा लाभ घेण्यास पात्र समजले जातील.

हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

त्यामुळे 1 मार्च ते 31 ऑगस्ट दरम्यान ज्या आर्थिक संस्थांनी त्यांच्या कर्जदारांना व्याज आणि चक्रवाढ व्याज लागू केले असेल, तर त्या वित्तपुरवठादारांनी 5 नोव्हेंबरपर्यंत व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरकाची रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा करावयाची आहे.

सर्व कर्जहप्ते वेळेवर भरलेले कर्जदार, ज्यांचे कर्ज रुपये 2 कोटी पर्यंतचे आहे आणि हे कर्जखाते 29 फेब्रुवारी 2020 अखेर अनुत्पादित (एनपीए) झालेले असता काम नये, असे कर्जदार या योजनेसाठी लाभार्थी असतील.

हे असतील कर्जाचे प्रकार…
1. गृहकर्ज
2. शैक्षणिक कर्ज
3. क्रेडिट कार्ड थकबाकी
4. वाहन कर्ज
5. ग्राहकोपयोगी वस्तू
6. लघुउद्योगासाठीचे कर्ज, इत्यादी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.