करोना आला अन बहुरूपी हतबल झाला

शासनाने बहुरूपी पेन्शन योजना सुरू करावी - बहुरूपी दशरथ जगताप

पुणे – करोनाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. त्यातही पूर्णत: कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांची परिस्थिती खूपच बिकट झाली. उदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकंती करणारे बहुरूपी यांनाही करोनाचा फटका बसला. करोनामुळे कलेला घरघर लागली आणि आर्थिक संकट निर्माण झाले. 

आधीच विज्ञान व संगणक युगात बहुरुपी कला हद्दपार होतेय त्यातच करोनामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. परिणामी करोना आला अन बहुरूपी हतबल झाला अशीच परिस्थिती झाली, असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही.

त्यामुळे हातावर पोट असलेल्या बहुरूपी कलाकारांना  सरकार व शासनाने मदत करावी आणि शासनाने बहुरूपी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी बहुरूपी कलाकार दशरथ जगताप यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.