कांदा उत्पादन खर्च, अधिक ५०% नफा दराने सरकारने खरेदी करावा -मुंडे 

मुंबई: देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढण्यासाठी आणि वाढीव भाव मिळावा म्हणून सरकारने रविवारी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. कांद्याच्या सर्व प्रकारच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्यात आली आहे,’असे “डायरेक्‍टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड’ (डीजीएफटी)ने एका अधिसूचनेत म्हटले आहे.

मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. “शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाल्यावर सरकार निर्यातीवर निर्बंध आणतंय. २-२ महिने आंदोलन केल्यानंतर १-२ रुपयाची मदत शेतकऱ्यांना मिळते. तडकाफडकी निर्बंध घालून बाजारभाव पाडायचा असेल तर शेतातला सर्व कांदा उत्पादन खर्च, अधिक ५०% नफा या दराने सरकारने खरेदी करावा. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

हेही वाचा…

कांद्याच्या निर्यातीवर बंदी

Leave A Reply

Your email address will not be published.