राज्यात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे

कराड – राज्यात अतिवृष्टी व अन्य गंभीर प्रश्‍न आहेत. त्यांच्याशी युतीला देणेघेणे नसून कोण कुठलं पद घेणार यासाठी “तू तू-मैं मैं’ सुरू आहे. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे असल्याचे मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली.

ते म्हणाले, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कॉंग्रेस व राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेनेकडे आवश्‍यक संख्याबळ असल्याने त्यांनी मतभेद बाजूला सारून सरकार बनवले पाहिजे. मात्र, दोघांमधील मतभेद टोकाला गेले आहेत. महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे. निवडणुकीपूर्वी त्यांचे काय ठरले होते, यावर उलटसुलट विधाने होत आहेत. हा पेचप्रसंग महाराष्ट्रासाठी चांगला नसून युतीने त्यातून मार्ग काढला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.