सरकार म्हणते नमो टीव्हीला सरकारी परवानगीची आवश्‍यकता नाही 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि भाजपचा प्रचार करण्यासाठी नमो टीव्ही नावाची एक स्वतंत्र वाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्या विषयी निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून खुलासा मागवला होता. त्यावरील खुलासा या मंत्रालयाने सादर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी जाहीरातीसाठी हा प्लॅटफॉर्म सुरू केला असून त्याला सरकारी अनुमतीची गरज नाही.

हा नियमीत टीव्ही चॅनल नाही आणि त्यामुळेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंजुर वाहिन्याच्या यादीत त्याचा समावेश नाहीं. ऍडव्हर्टायझिंगसाठी अशा प्रकारचा तात्पुरता चॅनल सुरू करण्यास सरकारी परवानगीची आवश्‍यकता नसते असे माहिती आणि प्रसारण खात्याचे म्हणणे आहे. या वाहिनीला आक्षेप घेणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्या होत्या त्याची दखल घेत आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हा अहवाल मागवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.