कर्नाटकातील राजकीय ‘नाट्य’ थांबेना; काँग्रेसनंतर आता जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

बेंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या कार्यालयाने आज कर्नाटकातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या कर्नाटक सरकारमधील मुख्यमंत्री वगळता सर्व ११ मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची माहिती दिली आहे. जेडीएसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे सादर करण्याआधी मित्रपक्ष काँग्रेसच्या मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले असून आता कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर असून मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह जेडीएसचे १२ तर काँग्रेसचे २२ मंत्री आहेत. दरम्यान, जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सध्या जेडीएस-काँग्रेस प्रणित कर्नाटक सरकार अडचणींमध्ये सापडले असून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.