भारतातील सरकार अजूनही निवडणुकीच्याच मानसिकतेत – पाकिस्तान विदेश मंत्र्यांची टिपण्णी

बिशकेक – भारताशी यापुढे समानतेच्या आधारावरच आणि सन्मानानेच यापुढे व्यवहार होईल असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी केले आहे. शांघाय सहकार्य परिषदेसाठी ते येथे आले आहेत. आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीची माहिती देताना ते बोलत होत. ते म्हणाले की दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली आणि त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि त्यांनी एकमेकांची विचारपुसही केली असे त्यांनी आज जिओ न्युज या संस्थेशी बोलताना सांगितले. भारतातील सरकार अजून निवडणुकीच्याच मानसिकतेत आहे आणि त्यांना आपली मतपेढी कायम ठेवायची आहे याच भूमिकेतून ते पाकिस्तानशी व्यवहार करीत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे.

भारताच्या पाक विषयीच्या भूमिके विषयी बोलताना ते म्हणाले की भारतातील सरकार हे केवळ निवडणुकीच्या मानसिकतेतले सरकार असून त्यांनी आपली वोट बॅंक सुरक्षित ठेवायची आहे. या पार्श्‍वभूमीवर आम्हाला जे काही सांगायचे आहे ते आम्ही त्यांना सांगितले आहे असे ते म्हणाले. आम्ही कोणाच्या मागे धावणार नाही आणि कोणाच्याही बाबतीत आडमुठी भूमिका घेणार नाही. आमची भूमिका नेहमीच वास्तववादी राहिली आहे. असे ते म्हणाले.

पाकिस्तानने भारताला सातत्याने चर्चेसाठी पुढे येण्याचे निमंत्रण देण्याची गरज नाही असा सूर आता पाकिस्तानातून निघत आहे त्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली. आम्हाला भारताशी समानतेच्या आधारावर सन्मानाचे चर्चा हवी आहे आता पाकिस्तानशी चर्चा करायची की नाहीं हे भारताने ठरवले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांना आपली मतपेढी कायम ठेवायची आहे त्यामुळे ते अजूनही त्याच भूमिकेत आहेत अशी टिपण्णीही त्यांनी केलीे.

Leave A Reply

Your email address will not be published.