मुंबई : देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना मात्र खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे
जरी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असतील आणि मी मंत्रिमंडळाच्या बाहेर असेन असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं मात्र त्यावरून तर्क लढवले जात आहेत की, जरी शिंदे मुख्यमंत्री झाले तरी रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच असेल . कारण या सरकारमध्ये आपण नसणार, मात्र या सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे काम करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शिवाय सरकारचा कारभार सुरळीत चालेल याकडे देखील देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा विकास आणण्याचे त्यांनी म्हंटले आहे. या सगळ्या त्यांच्या वक्तव्यामुळेच
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील मात्र रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे असेल अशी चर्चा होत आहे.