शिर्डी – गांधी परिवारातील कोणीही कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढणार नसल्यामुळे मी आता साईदर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊन सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरणार असून, तशी तर मला कोणत्याच पदाची अपेक्षा नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करण्यास तयार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज एका दिवसाच्या नगर दौऱ्यावर आले आहे. दौऱ्यादरम्यान गेहलोत यांनी शिडीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. त्याच बरोबर साईबाबांची आरती व पाद्यपूजा केली. साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेसही संविधानानुसार काम करते. सध्या देशात सरकारी यंत्रणाचा दबाब आणत काम सुरू आहे. मी मोदींना नेहमी सांगतो, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. देशात सध्या जातीय तणाव व हल्ले होत असून, तुम्ही हे थांबविण्याठी देशाला आवाहन केले पाहिजे.