-->

शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

मुंबई : शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आझाद मैदान येथे विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करीत असलेल्या शिक्षक-कर्मचारी संघाशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भाई गिरकर, आमदार अभिमन्यू पवार, डॉ.रणजित पाटील, रामराव पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिक्षकांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत असून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.